कातकरींच्या आयुष्यात आभाळमाया

स्रोत: भगीरथ प्रतिष्ठान      तारीख: 02-Feb-2019

‘आभाळमाया’ हा शब्द आपण बरेचदा ऐकतो. ज्यांचे आभाळ हेच छप्पर व जमीन हेच घर आहे अशी कातकरी समाजातील मुले शिक्षण प्रवाहामध्ये येत आहेत, पण एकूणच अन्यायाचा काळोख अधिक आहे. अशावेळी ‘सोलार दिवा’ नवीन पायवाट दाखवतो.

तळवणे (खरीवाडी), तालुका सावंतवाडी येथे गेली २० वर्षे हे कातकरी राहतात. शाळेमध्ये जाणारी मुलं, काही तान्ही बाळं या झोपड्यांमध्ये माळरानावर राहतात. भगीरथ ग्रामविकास प्रतिष्ठानने त्यांना सोलार दिवे दिले. पंचायत समिती, सावंतवाडीचे उपसभापती श्री. संदिप नेमळेकर, विस्तार अधिकारी श्री. प्रशांत चव्हाण, भगीरथ ग्रामविकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. प्रसाद देवधर, श्री. नवीन मालवणकर, श्री. मुकेश ठाकूर यांनी यासाठी नियोजन केले होते.