तेंडोली गाव धूरमुक्त करण्याचा संकल्प
स्रोत: भगीरथ प्रतिष्ठान तारीख: 09-Jun-2016 |
गाव तेंडोली - नवीन गावातील काम
तेंडोली या गावामध्ये सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या कर्जातून ३२ बायोगॅस बांधून पूर्ण झाले. अजूनही काही बायोगॅस बांधून पूर्ण होतील. बायोगॅसधारक शेतकऱ्यांना प्रेशर कुकर, सुरण बियाणे व शेतीचे साहित्य (फावडा, पिकाव, घमेले) वितरीत करण्यात आले. पुढील ३ वर्षांमध्ये तेंडोली गाव धूरमुक्त करण्याचा संकल्प यावेळी सर्वांनी केला.